बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजपासून ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

सोलापूर | कोरोना रुग्णांची संख्या वाढली असताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर हे इंजेक्शन जिल्हाधिकारी नियंत्रण पक्षातर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येत होतं.

दरम्यान, रेमडेसिविर हे इंजेक्शन आता खुल्या बाजारात मिळणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात आता इंजेक्शन व इतरही तत्सम औषधं आजपासून खुल्या बाजारात उपलब्ध असणार आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार 11 एप्रिलपासून रेमडेसिवीर हे इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत वितरित करण्यात येत होते. तसेच इतर खुल्या बाजारामध्ये हे इंजेक्शन विकण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. साधारण 1200 रुपयाचं असणारं हे इंजेक्शन अडवणूक करून रुग्णांच्या नातेवाईकांना 50 ते 80 हजारांपर्यंत विक्री करण्यात आलं होतं.

रुग्णालयांना किंवा रुग्णांना औषधाची गरज भासल्यास ते आता जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांशी संपर्क करून खुल्या बाजारातून हे इंजेक्शन खरेदी करू शकणार आहेत. सध्या इंजेक्शनचा मुबलक साठा जिल्हाभरात उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

आजही सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर; वाचा ताजे दर

…..म्हणून लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन नवरोबा झाडावर जाऊन बसला

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

महाराष्ट्रात उद्यापासून नवे निर्बंध लागू; काय सुरू?, काय बंद?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

’40 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार’

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More