बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर उत्पादकाला पोलिसांनी उचललं, विरोधी पक्षनेते लगेच पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. राज्यात सर्वच जिल्ह्यांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.

दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.  मात्र शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं. यानंतर भाजप नेते लगेच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याचं पहायला मिळालं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकावर गंभीर आरोप केला आहे.

ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही या इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी डोकानिया यांना विचारला. त्यानंतर राजेश डोकानिया यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होतं, असं स्पष्ट केलंय.

फक्त भाजपच्या नेत्यांना इंजेक्शन्स दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची परवानगी होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

 

 

थोडक्यात बातम्या- 

महिला PSIवर सहकारी APIकडून 8 वर्षे बलात्कार, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

कोरोना लस घेतल्यावर रक्ताच्या गुठळ्या?, WHO ने केला मोठा खुलासा

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या 

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा, अन्…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More