बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

पुणे | महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 15  दिवसांचे कडक संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं दिसून आलं.

रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांना देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी इंजेक्शन मिळत नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची माफी मागणारी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

“माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत हतबलता! सॉरी पिंपरी-चिंचवडकर” अशा आशयाची फेसबुक पोस्ट करून आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांची माफी मागितली आहे. सध्या संपूर्ण राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करून वाढीव दराने विकणाऱ्या लोकांवर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला हा कृत्रिम तुटवडा असल्याचं बोललं जात होतं, परंतु त्यानंतर राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देत राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असून आपण लवकरच इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

‘त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; अमोल कोल्हे भाजप नेत्यांवर बरसले

गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

हुंड्यामध्ये बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाने भर वरातीत काढले कपडे अन्…

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहिती”

“शेतकरी, सलून दुकानदार, टॅक्सी चालक, मुंबईतील डबेवाले यांना आर्थिक पॅकेज द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More