“माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी लवकरच जेलमध्ये जाणार”
मुंबई | आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. याशिवाय त्यांनी भाजपवर आणि केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केलेला पहायला मिळाला. अशातच आता संजय राऊत यांनी सगळे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही दिला आहे.
राज्यात सुरु असणाऱ्या ईडी कारवाईवरुन संजय राऊतांनी भाजपला लक्ष केल्याचं पहायला मिळालं. ईडी म्हणजे भाजपसाठी एटीएम मशिन आहे, ईडीचे एक नेटवर्क देशातील खंडणी गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत. देशातल्या या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराची तपासणी आजपासून मुंबई पोलीस करणार आहेत. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. मार्क माय स्टेटमेन्ट… ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार, असा इशारा संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा सपाटा सुरु आहे. ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते अडचणींत सापडल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या –
“महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच धाडी का?, भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?”
‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, संजय राऊतांचा इशारा
‘ईडी ही भाजपची ATM मशीन आहे’; संजय राऊत कडाडले
“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”
Comments are closed.