बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातील ठाकरे सरकार काॅंग्रेसच्या टेकूवर उभं आहे हे लक्षात ठेवा”

सोलापूर | काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने ‘युपीए’चं नेतृत्व बदलाची वक्तव्य करत आहेत. युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असं ते परत परत म्हणत आहेत. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. काँग्रेसने मात्र राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे. संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर उभं आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा इशारा नाना पटोले यांनी  दिला आहे. तसेच राऊतांनी ‘युपीए’साठी शरद पवारांची वकीली बंद करावी, असेही बजावले आहे.

याचदरम्यान, या वादात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही उडी घेतली आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सोनिया गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती यांनी स्पष्ट केले. त्या शनिवारी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ‘युपीए’ अध्यक्षपदाच्या वादाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, ‘युपीए’च्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या युपीए’च्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

थोडक्यात बातम्या – 

“ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत”, भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

ठाकरे सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट; निलेश राणेंचा गंभीर आरोप

दिपाली चव्हाण यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारचा झटका, केली ही कारवाई!

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!

शेवटी प्रेम ते प्रेमच! पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीनेही सोडले प्राण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More