बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

नवी दिल्ली | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून(Uttar Pradesh Assembly elections) उत्तरप्रदेशमधील राजकारण चांगलचं तापलं आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेस(Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी एक व्हिडीओ ट्विट करत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. भाजप मत मागायला आलं तर हे लक्षात ठेवा, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रोजगार मागणाऱ्या युवकांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून(UP Police) लाठीमार करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत आता भाजप मत मागायला आले तर हे आठवणीत ठेवा, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सहाय्यक शिक्षक पदाच्या 69 पदांसाठी भरती प्रक्रीया राबवण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच भरती प्रक्रीयेमध्ये अनियमितता आल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

गेल्या दोन वर्षांपासून एससी आणि ओबीसी प्रवर्गातील अनेक तरूण तरूणी उत्तर प्रदेश सरकारशी लढा देत आहेत. शनिवारी तरूणांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या निवासस्थानावर मेणबत्ती मोर्चा (candle march) काढला होता. त्यानंतर त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यावरून प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील तरूण रोजगार द्या, असा आवाज उठवत होते, परंतु योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तरूणांना लाठ्या दिल्या, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कितीही लाठ्या मारल्या तरीही रोजगाराच्या हक्काच्या लढ्याची ज्योत विझू देऊ नका, या लढाईमध्ये मी तुमच्यासोबत आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकांत दादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही”

टेंशन वाढलं! नवी दिल्लीत Omicron चा पहिला रुग्ण सापडला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर

“ममता बॅनर्जी आल्या आणि महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या”

Omicron: पुणेकरांच्या चिंतेत वाढ, पुण्यातील कोरोनाबाधिताला Omicron नाही, पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More