बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

43 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली अन् पठ्ठ्याला लागली 1448 कोटींची लाॅटरी

नवी दिल्ली | कधी कोणाचं नशिब बदलेल काही सांगता येत नाही. कोणी एका रात्रीत स्टार होतो. तर कधी कोणी एका रात्रीत बरबाद होतो. अशीच एक घटना केरळच्या कोचीमध्ये घडली आहे. एका वयक्तीने 43 वर्षापुर्वीची केलेेली एक गोष्ट आठवली आणि एका तरूणाला एक दोन नव्हे तर तब्बल 1448 कोटींची लाॅटरी लागली.

कोचीमधील एका गुंतवणूकदाराने 43 वर्षापूर्वी म्हणजेच 1978 मध्ये साडेतीन हजार रूपयांचे समभाग खरेदी केले होते. मात्र काळाच्या ओघात त्याला त्या गुंतवणुकीचा विसर पडला. त्यानंतर आता त्याला त्या समभागांची आठवण झाली. आता या समभागांची किंमत एक दोन नव्हते तर 1448 कोटींवर गेली आहे. बाबू जाॅर्ज वालावी, असं या गुंतवणुकदाराचं नाव आहे.

बाबूने 1978मध्ये मेवाड ऑईल अँड जनरल मिल्स लिमिटेड या कंपनीचे 3500 शेअर्स विकत घेतले होते. त्यावेळी या कंपनीची अधिकृत नोंदणी झाली नव्हती. आता शेअर होल्डर बाबूला 1448 कोटी देण्यास कंपनीने नकार दिला आहे.  कंपनी त्यावेळी नोंदणीकृत नसल्याने लाभांश देण्याचा प्रश्नच येत नाही, असं कंपनीने सांगितलं आहे. बाबू आणि कंपनीमध्ये सुरू असलेला हा वाद आता सेबीपर्यंत पोहोचला आहे.

दरम्यान, मेवाड ऑईल अँड जनरल मिल्स लिमिटेडने आपले पैसे द्यावेत यासाठी बाबू वालावीने सेबीकडे धाव घेतली आहे. बाबूने डिमाॅट अकाऊंट कंपनीशी संपर्क केला असता, कंपनीने त्याच्या समभागांची 1989 मध्ये विक्री केल्याचं आढळून आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की…”

‘लाच घेणं काही चुकीचं नाही, सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो’; भाजप आमदार बरळल्या

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

चालकाच्या धाडसाने प्रवाशांचा जीव धोक्यात, पुलावरून जाताना एसटी कोसळली; पाहा व्हिडीओ

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More