नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरलाही एक्झिट पोल हटवण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे अंदाज प्रकाशित करणाऱ्या माध्यमांना नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोग यावेळेसही सोशल मीडियातून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व एक्झिट पोलवर लक्ष ठेवून असणार आहे.
निवडणूक आयोगाकडून असे कोणते आदेश देण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते, परंतू त्याच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे अंदाज दाखवणाऱ्या 3 माध्यम संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती.
दरम्यान, 19 मे रोजी सातव्या टप्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने माध्यमांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-दुसऱ्या पक्षाचा पंतप्रधान चालेल, पण नरेंद्र मोदी नकोच- काँग्रेस
-उशिरा येणाऱ्या खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी धोनी द्यायचा ‘ही’ शिक्षा
-राहुल आता तरी मोठा हो; भाजप नेत्याचा राहुल गांधींना टोला
-शहा म्हणतात लोकशाहीची गळचेपी होते; विक्रम गोखले शब्दाला जागणारे; जितेंद्र आव्हाडांचा टोला
-“देशाचा पंतप्रधान होण्याची पात्रता राहुल गांधींमध्ये नाही”
Comments are closed.