बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

कोलकाता | नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 विधानसभेच्या निवडणूका जाहीर केल्या. तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यातील विधानसभेच्या आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूका होणार आहेत. केंद्रात सत्तेत असलेला भाजप पक्ष पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. याच भाजपला निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.

निवडणूक लागताच पश्चिम बंगालमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील पंतप्रधान मोदींचे फोटो असलेले होर्डींग हटवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. हे एक प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. तृणमुल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि हा मुद्दा मांडला. त्यानंतर या होर्डिंगमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने 72 तासाच्या आत होर्डिंग हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेल्या कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावरही या शिष्टमंडळाने आक्षेप नोंदवला आहे. हा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप या शिष्टमंडळातील ममता सरकारमधील मंत्री फरहाद हकिम यांनी केला आहे. मोदी या निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे मतदार या फोटोंमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपकडून या निवडणूकीत नरेंद्र मोदी, अमित शहा यांसारख्या नेत्यांपासून भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री देखील निवडणूकीच्या प्रचारात उतरतील. तर तृणमुल काँग्रेस देखील या निवडणूकीत दंड थोपटून रणांगणात उतरले आहे. यामुळेच यंदा पश्चिम बंगालच्या निवडणूकीत कोण बाजी मारेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

थोडक्यात बातम्या-

…तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत- असदुद्दीन ओवैसी

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप

खळबळजनक! नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

धक्कादायक!! औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

6,6,6,6,6,6…! युवराजचा रेकाॅर्ड ‘या’ खेळाडूने मोडला, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More