बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”

परभणी | परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांना बदलून त्यांच्या जागी दुसरा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. परभणी जिल्ह्याला पूर्णवेळ देणारा पालकमंत्री हवा, अशा मागणीचे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नवाब मलिक हे राज्यातील मोठे नेते असून त्यांच्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे ते परभणी जिल्ह्याला वेळ देण्यात असमर्थ ठरत आहेत. असं म्हणत जिल्ह्याला नवा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबरोबरच, पालकमंत्र्यांची जबाबदारी पार पाडत असताना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी नवाब मलिक यांनी परभणी जिल्ह्याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं पण त्यांनी जिल्हा दुर्लक्षित ठेवला असल्याचाही आरोप शिवलिंग बोधने यांनी या पत्रात केला आहे.

परभणीमध्ये सध्या बेड्स आणि रेमडेसिविर इंजेक्शन यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईला बसून परभणीचा कारभार कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न सामान्य परभणीकर विचारत होते. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्याला नवा कर्तव्यदक्ष आणि पूर्ण वेळ देणारा पालक मंत्री लवकरात लवकर द्यावा आणि जिल्ह्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांना केली आहे.

थोडक्यात बातम्या

‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार 

नोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

यांच्यापेक्षा गिधाड बरी! वॉर्डबॉयनं मृताच्या बोटाचे ठसे वापरून केलं हे धक्कादायक कृत्य

ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचे चौकशीचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More