Vastu Tips l घरात बंद पडलेलं किंवा चालू नसलं तरी भिंतीवर टांगलेलं घड्याळ अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, अशा घड्याळांमुळे जीवनातील प्रगती थांबते, अडथळे निर्माण होतात आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे घरात बंद घड्याळ असेल, तर ते तात्काळ काढून टाकावं, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
बंद घड्याळ म्हणजे अडथळ्यांचं प्रतीक :
ज्योतिषशास्रानुसार, बंद घड्याळ केवळ वेळच थांबवत नाही, तर ते आयुष्यातील अडचणी, अडथळे आणि दु:खाचे संकेतही देते. त्यामुळे अशा घड्याळांकडे हलकं घेऊ नका.
जर घरात बंद घड्याळ असेल आणि ते टाकायचं ठरवलं असेल, तर त्याआधी एक छोटा परंतु प्रभावी उपाय करा.
Vastu Tips l आपल्या समस्येचं प्रतीक कागदावर लिहा :
– हे कागद घड्याळासोबत काळ्या कपड्यात बांधा.
– ते संपूर्ण वस्त्र घरापासून दूर असलेल्या स्वच्छ कचरापेटीत ठेवा.
– परत येताना मागे वळून पाहू नका.
असं मानलं जातं की, या क्रियेमुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जाते आणि तुम्हाला नवीन सुरुवात मिळते.
कोणत्या प्रकारचं घड्याळ ठेवावं? :
पेंडुलम असलेलं घड्याळ, पूर्व दिशेला लावणं वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं. पूर्व दिशा उगवत्या सूर्याची आणि नवीन संधींची दिशा आहे. अशा घड्याळामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.