देश

शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली

Loading...

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या घरातील दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता मोदी सरकारकडून सुरक्षा हटवण्यात आल्याची माहिती आहे.

शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सहाजनपथ’मध्ये  दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान दिवसरात्र तैनात होते. मात्र निवासस्थानाबाहेरील सर्व सुरक्षा व्यवस्था 20 जानेवारी रोजी हटवण्यात आल्याचं कळत आहे. यासोबतच दिल्लीतील 40 महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही अचानक कपात केल्याचं कळतयं.

पवार यांच्या दिल्ली कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा हटवली का?, असा प्रश्न केला जात आहे. पवारांची सुरक्षा काढण्यामागील कुठलंही कारण अद्याप कळलं नाही, अशी माहिती दिल्ली कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उपयोग अन्यत्र केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सुरक्षा हटवण्यापूर्वी कल्पना न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या – 

“मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेेब ठाकरे आहे”

मी मुख्यमंत्री होईन, असं वचन शिवसेनाप्रमुखांना कधीच दिलं नव्हतं- उद्धव ठाकरे

धर्माला हात लावला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या