‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका
नवी दिल्ली | चित्रपट निर्मात्या आणि लेखिका लीना मनीमेकलाई यांचा नवीन डॉक्युमेंट्री चित्रपट काली वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कॅनडाची राजधानी ओटाव्वा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने या चित्रपटा संबंधात महत्वाचा निर्णय दिला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये ताबडतोब वगळण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आणि संबंधितांना दिले आहेत.
भारतीय उच्चायुक्तालयाने 4 जुलै रोजी एक अध्यादेश काढला आहे. देशभरातील हिंदु संघटना आणि त्यांच्या नेत्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यात त्यांनी हिंदु देवतेला आक्षेपार्ह आणि चुकीच्या वेशात आणि स्थितीत दाखविल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. तसेच भारतात देखील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
लीना मनीमेकलाई (Leena Manimekalai) या मुळ भारतातील तमिळनाडू राज्यातील मधुराई येथील चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका आहेत. यांच्या वादग्रस्त काली चित्रपटात हिंदु देवता कालीमातेच्या अवतारात (पोशाखात) एक अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसत असून तिच्या एका हातात समलैंगिकतेचा (LBGTQ Flag) झेंडा आहे. यामुळे या चित्रपटाला ट्विटरवर देखील ट्रोल केले जात आहे.
दरम्यान, लीना मनीमेकलाई यांच्या मते सदर चित्रपट हा ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा फेस्टीवल, आगा खान संग्रहालय, टोरंटो साठीचा एक भाग असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी अशा प्रकारची माहिती देणारी पोस्ट 2 जुलै रोजी ट्विटवर टाकली होती.
थोडक्यात बातम्या –
लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर
‘… तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंना बावरट करणारे ‘ते’ चार जण कोण?, गुलाबरावांचा रोख कुणाकडे???
‘ज्या चार लोकांच्या नावानं बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळेच…’, संजय राऊत कडाडले
‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली
Comments are closed.