…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!
नाशिक | कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुबंई आणि पुण्यात आकडे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लवकरच महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 10 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मास्क घालण्याचं आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारी नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी देखील राज ठाकरे विनामास्क नाशिकात दाखल झाले. यावेळी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या समवेत इतर पदाधिकारी आले होते. स्वागतावेळी अशोक मुर्तडक यांनी मास्क घातलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी मुर्तडकांना मास्क काढण्याचा आदेश दिला. त्यानंतर लगेच आदेश मान्य करत मुर्तडकांनी मास्क काढला.
राज ठाकरे दीड वर्षांनी नाशिकमध्ये पोहोचले आहेत. झालेल्या प्रकारामुळे राज ठाकरेंवर कारवाई केली जाईल की नाही? अशी चर्चा रंगली आहे. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांनी गर्दी करू नये असा इशाराही दिला होता.
दरम्यान, मुंबईत झालेल्या एका मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय, असं उत्तर राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर त्यांना माझा नमस्कार सांगा, अशी सौम्य भुमिका घेतली होती. तर काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय बैठकीत देखील राज ठाकरे विनामास्क आले होते.
थोडक्यात बातम्या-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस
रस्त्यात छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तिने बेशुद्ध होईपर्यंत धू-धू धुतलं!
…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचं लक्षण नाही, हा उठावडेपणा आहे- एकनाथ खडसे
तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा
रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा
Comments are closed.