Top News खेळ देश

“वाॅर्नरला हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हटवा, त्याचा फिक्सिंगमध्ये सहभाग”

Photo Crdit - Facebook / @davidwarner31

हैदराबाद | आयपीएल 2021 साठी नुकतीच लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे लक्ष न दिल्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. हैदराबादमधील अनेक पात्र असलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. या लिलावानंतर हैदराबादमध्ये एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार आणि माजी मंत्री नागेंद्र यांनी डेव्हिड वॉर्नरवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. डेव्हिड वॉर्नरवर 2017 मध्ये बॉल टेम्परिंगचा आरोप झाला होता. त्यामुळे वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात यावे, असं त्यांनी सांगितलं आहे. नागेंद्र यांनी सनरायझर्सला चेतावणी दिली की एकतर शहरातून खेळाडू निवडा किंवा त्यांच्या टीमच्या नावावरून ‘हैदराबाद’ वगळा. हैदराबादचे खेळाडू निवडले गेले नाहीत तर जेव्हा हैदराबादमध्ये आयपीएलचे सामने होतील तेव्हा ते आणि त्यांचे समर्थक या सामन्यांना विरोध करतील, असंही नागेंद्र यांनी सांगितलं.

निवड प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला नागेंद्र यांनी केला आणि सांगितले की, हैदराबादमधील अनेक स्थानिक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. हैदराबादमध्ये अनेक गुणवान खेळाडू असूनही एकालाही फ्रँचायझीने संघात घेतलेले नाही. सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात हैदराबादमधील स्थानिक खेळाडूंचा समावेश करावा, अन्यथा संघाच्या नावामधून हैदराबादचे नाव काढून टाकावे, असा इशारा नागेंद्र यांनी दिला आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर 2018 मध्ये खेळला नव्हता. मात्र, 2019 मध्ये त्याने जोरदार पुनरागमन केले आणि केवळ 12 सामन्यात 692 धावा करुन तो संघासाठी अग्रगण्य ठरला. आयपीएल 2020 मध्ये वॉर्नरने पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले होते.

थोडक्यात बातम्या – 

“कॉलर उडवणारे आणि मिशी पिळणारे घरात बसले आहेत”

अडवाणी, अजित पवारांनी जी परंपरा पाळली ‘ती’ संजय राठोडांनीही पाळावी- सुधीर मुनगंटीवार

धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

…अन् पुन्हा एकदा भर कार्यक्रमात नेहा कक्करला कोसळलं रडू, सारेच झाले स्तब्ध!

सोन्याच्या दरात वाढ, चांदीला झळाळी; जाणून घ्या आज काय आहेत भाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या