बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲाफिसमध्ये मास्क काढून जोरात खोकला, पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यातच स्पेनमधून कोरोना संक्रमण केल्याबद्दल एका व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. त्या व्यक्तीवर 22 लोकांना कोरोना संक्रमित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनच्या मलोर्का शहरात 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्या व्यक्तीने आपलं दररोजचं काम सुरूच ठेवलं. आणि ताप असतानाही तो ऑफिसला जात होता आणि शहरातही इतर ठिकाणी फिरत होता.

ऑफिसला गेल्यानंतर एकदा संबंधित व्यक्ती चेहऱ्यावरील मास्क काढून जोरात खोकला आणि सगळ्यांना ओरडून म्हणाला की, मी सर्वांना कोरोना संक्रमित करणार, त्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याची तक्रार केली, तेव्हा तो पळून गेला. जाणून-बुजून कोरोना संक्रमण वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे त्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

स्पेनच्या या व्यक्तीच्या अशा बेजबाबदार वागणुकीमुळे तब्बल 22 लोकांना कोरोनाची लागण झाली. ज्या लोकांना कोरोना झाला आहे त्यातील काही जण त्याच व्यक्तीच्या कार्यालयात काम करतात. तर इतर जण कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला ज्यामध्ये तीन लहानग्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे. वेळीच केलेल्या कारवाईमुळे आणखी संक्रमणाचा धोका तूर्तास तरी टळला आहे.

थोडक्यात बातम्या –

ज्याच्यासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही; आई बापानं उचललं अभिमानास्पद पाऊल

…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच नवरीला लागली हळद, कारण ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

एका रेमडेसिवीरची किंमत ऐकून हैराण व्हाल, पुणे गुन्हे शाखेकडून चौघांना अटक

कंगणाने केलं पाकिस्तानचं कौतुक, नेटकऱ्यांचा पारा चढला

रॉकस्टार जडेजा! जडेजाने एका षटकात काढल्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More