Top News पुणे महाराष्ट्र

‘पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा’; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे | औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. सध्या या नामंतरावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र अशातच पुण्याचं नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव देऊन या शहराचं नामांतर ‘जिजापूर’ असं करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नामांतराचं राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असंही संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामंतराला भाजप आणि मनसेने पाठींबा दर्शवला आहे. मात्र काँग्रेसने आपला या नामंतराला विरोध असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“लस टोचणं हे स्किल, मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल”

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले

“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण!”

‘…तर काँग्रेसला खूश केलं असतं’; कंगणा राणावतची उर्मिला मातोंडकरांवर बोचरी टीका

भिवंडीतील शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांकडून गोळीबार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या