औरंगाबादच्या नामांतराबाबत शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…
औरंगाबाद | राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत शिवसेनेतील 40 आमदार आपल्या गटात वळविले. त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. या याचिकेला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले. न्यायालयाने निकाल राखून ठेवत 11 जुलै तारीख दिली. त्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.
राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी कॅबिनेट बैठक बोलावली. व त्यात 3 महत्वपूर्ण निर्णय घेतले. औरंगाबादचे नाव संभाजी नगर, उस्मानाबादचे नाव धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव. त्यानंतर त्यांनी फेसबूक लाईव्ह येत आपण मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अधिकृतरित्या पडले.
नामांतराच्या निर्णयावर खळबळजनक खुलासा करत नव्या वादांना तोंड फोडणारे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केले आहे. औरंगाबादेत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नाव बदलण्याचा निर्णय ऐनवेळी मंत्रीमंडळ पडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (NCP) याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हा महाविकास आघाडीचा निर्णय नव्हता. नामांतराचा निर्णय पूर्णपणे उद्धव ठाकरेंचा खाजगी निर्णय आहे, असा खुलासा शरद पवारांनी केला.
दरम्यान, मविआच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेस आमदारांनी नामांतराच्या प्रस्तावाला विरोध न केल्याबद्दल, बहुमत चाचणीला गैरहजर राहिल्याबद्दल आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत पक्षाविरोधात मत दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी याप्रकरणी अहवाल मागविला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे हे नामांतर प्रकरण चिघळणार असल्याचे बोलेले जाते आहे.
थोडक्यात बातम्या –
‘आज खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो’ -दिलीप वळसे पाटील
बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर
महाविकास आघाडी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार, बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
वारकऱ्यांसाठी पंढरपूरात दानवे बनले चहावाला, दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा
Comments are closed.