बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री

मुंबई | भारतात आकर्षक गाड्यांची मोठी क्रेझ असते. तर चारचाकी गाड्यांना भारतात मोठी मागणी देखील आहे. खासकरून तरूण वर्गातून मोठ्या आणि आकर्षक गाड्यांची मागणी असते. तरूण वर्गाची आवड आणि खिशाला परवडेल असेल अशी एक आलिशान कार भारतात विक्रीस आणली आहे. रेनाॅ कायगरचे नवे माॅडेल बाजारात आल्याने ग्राहक वर्ग या गाड्यांकडे उत्सुकतेने पाहत आहे.

भारतात ऑटो सेक्टरमधली रेनाॅ इंडिया ही एक अग्रगण्य कंपनी आहे. रेनाॅ इंडियानेे सब फोर मीटर एसयूव्ही कायगर मागील महिन्यात म्हणजे 15 फेब्रुवारीला लाँच करण्यात आली होती. काही दिवसांपासून या कारची नोंदणी देखील चालू केली होती.

कंपनीने म्हटलं आहे की, विक्रीच्या पहिल्याच दिवशी कंपनीने तब्बल 1100 युनिटसची डिलिव्हरी केली आहे. या रेनाॅ कायगरची एक्स किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरू झाली असून या प्रकारातील टाॅप वेरियंटची किंमत 9.55 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 99 बीएचपी पॉवर आणि 160 एनएम टॉर्क निर्माण करु शकेल. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा देखील यामध्ये दिली गेली आहे. एएमटीसह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

परदेशातील व्यक्तीलाही दिला सोनू सूदने मदतीचा हात; केलं ‘हे’ कौतुकास्पद काम

‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर?’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More