Top News देश

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली | देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

यासोबतच शिंजो आबे, डॉ. बेली मोनाप्पा हेगडे, नरिंदर सिंग कपानी, मौलाना वाहीदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहू यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसंच यासोबतचं दहा जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह तारलोचन सिंह, महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक, केशूभाई पटेल, नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगोई, कृष्णन नायर यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून या आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दात अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रजासत्ताकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना आदरांजली

“शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली”

ट्रॅक्टर परेडमधील शेतकऱ्याला स्टंटबाजी करणं पडलं महागात; पाहा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर

शेतकरी जनसंवादादरम्यान सिंघू सीमेवर काँग्रेसच्या ‘या’ खासदारावर प्राणघातक हल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या