महाराष्ट्र मुंबई

कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्मानं मौन सोडलं; केला मोठा खुलासा

मुंबई | रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला. त्यानंतर आता रेणू शर्माने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असं रेणू शर्माने म्हटलंय.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं रेणू शर्माने म्हटलंय.

धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असं रेणू शर्माने स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड

धनंजय मुंडे प्रकरणात आता व्हिडीओ क्लिप्स; पीडितेच्या वकिलाचा धक्कादायक दावा

…तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; ‘या’ मनसे नेत्याचा धक्कादायक गौप्यस्फोट

मनसेच्या ‘या’ नेत्यालाही रेणू शर्मांचा फोन; कृष्णा हेगडेंचा खळबळजनक दावा

‘धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी’; रेणू शर्माच्या वकिलांचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या