बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून हेगडे देखील आता माझ्यावर आरोप करत असावेत”

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना रेणू शर्माने भाजपचे नेते कृष्णा हेगडेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

मी हेगडे यांचा आदर करायचे. आताही मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आमची भेट प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली. ते स्वत: पुढाकार घेऊन माझ्याशी बोलले, असं रेणू शर्माने सांगितलंय.

मुंडेंनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यामुळेच आता हेगडेदेखील माझ्यावर आरोप करत असावेत. कदाचित ते मुंडेंचे मित्र असावेत, असंही रेणू शर्माने सांगितलंय.

दरम्यान, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे गंभीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप रेणू शर्माने केलाय.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन!

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरु होणार- वर्षा गायकवाड

‘…म्हणून मी गप्प होते’; रेणू शर्माचे धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप

‘धनंजय मुंडेंनी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ घेतले आहेत’; रेणू शर्माचा मोठा गौप्यस्फोट

“धनंजय मुंडे यांनी 2006 पासून फक्त माझा वापर केला आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More