मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे गंभीर आरोप तक्रारदार तरूणीने मागे घेतले आहेत. रेणू शर्माने आरोप का मागे घेतले यासंदर्भात एक निवेदन ट्विट केलं आहे त्यामध्ये कारण सांगितलं आहे. निवेदनात तिने विरोधी पक्षावर बोट केल्याचं दिसून आलं आहे.
विरोधी पक्ष मुंडेंविरूद्ध जाताना पाहून मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदुका ठेऊन चालवत आहेत आणि हे सर्व चुकीचे आहे, असं रेणू शर्माने म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध दाखल केलेली तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. मला त्याच्याविरुध्द अशी कोणतीही तक्रार द्यायची नाही, असंही रेणू शर्माने म्हटलं आहे.
माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून तणाव निर्माण झाला असून कोर्टात खटला सुरू झाल्याने मी मानसिक तणावाखाली असल्याचं रेणूने निवेदनात म्हटलं आहे.
🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/MBVGH8JgzT
— renu sharma (@renusharma018) January 22, 2021
थोडक्यात बातम्या-
सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे
“आमची भीती खरी ठरली, गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”
मला माझ्या घरातील माणसांची नावं खराब करायची नाहीत, म्हणून मी तक्रार मागे घेते- रेणू शर्मा
Comments are closed.