मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रेणू शर्मा नावाच्या तरूणीने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. मात्र ते आरोप फेटाळून लावत मुंडेंनी करूणा शर्मा म्हणजेच रेणू शर्माची मोठी बहिण यांच्यासोबत असलेल्या आपल्या नात्याची कबुली दिली.
मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं. यासंबंधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. यावर तक्रारदार तरूणी रेणू शर्माने मुडेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
ब्लॅकमेलशिवाय दुसरा कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊ शकत नाहीत. परंतू मी मरेपर्यंत लढत राहणार असल्याचं रेणू शर्माने म्हटलं आहे. याबाबत रेणूने ट्विट केलं आहेत.
दरम्यान, मुंबई पोलीस असो की इतर राज्यांची पोलीस मी सर्वांचा आदर करते. पण काही लोक त्यांच्या पदाचा फायदा उठवून पोलिसांना काम करू देत नाही, असा आरोपही रेणू केला आहे.
Ye blackmail k alawa koi our baat ka sahara le bhi nahi sakta, par Mai ladungi till mu death!!
— renu sharma (@renusharma018) January 12, 2021
थोडक्यात बातम्या-
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील- काँग्रेस
पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!
मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???
“धनंजय मुंडे प्रकरणात सरकारवर कोणताही दबाव नसून मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही”
‘…अन्यथा मंत्रिपद सोडायला तयार’; वडेट्टीवारांनी हाय कमांडकडे केली ‘ही’ मागणी