Top News महाराष्ट्र मुंबई

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र धनंजय मुंडेंनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. अशातच पुन्हा एकदा तरूणी रेणू शर्माने मुंडेंवर निशाणा साधला आहे.

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच, असं रेणू शर्माने म्हटलं आहे. यासंदर्भात रेणू शर्माने ट्विट केलं आहे. रेणू शर्माने सलग ट्विट केले आहेत त्यामुळे याप्रकरणाबाबत आणखी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर ठिकाणांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का केलं होतं?, मात्र मी रिपोर्ट केल्यावर लगेच मला अनब्लॉक केलं, असंही रेणू शर्माने म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस जेव्हा सखोल तपास करतील तेव्हा सगळं काही समोर येईलच असं म्हणत त्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

“आमच्याविरूद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुणे महानगरपालिका जिंकू”

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…

“…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या