Top News महाराष्ट्र मुंबई

…त्यावेळी ‘ओ साला धनंजय मुंडे’ म्हणत शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी- रेणू शर्मा

 मुंबई | रेणू शर्मा या तरूणीने राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर तरूणीवर मनसे नेते  मनीष धुरी यांनीही धक्कादायक आरोप केले होते. मात्र धुरींनी केलेल्या आरोपावर रेणू शर्माने स्पष्टीकरण दिलं आहे. रेणू शर्माने एबीपी माझाला मुलाखत दिली आहे.

मी मनीष धुरींसोबत संपर्क साधला होता. माझा त्यावेळी टेलिव्हिजन कॉर्पोरेशनवर रेणू सायोनारा गाण रिलीज होणार होतं. मात्र टेलिव्हिजन वाल्यांनी माझ्या गाण्याचा अल्बम ठेवून घेतला होता आणि रिलीजही करत नव्हते. यासाठी मी धुरींची मदत मागितली होती, असं रेणू शर्माने म्हटलं आहे.

यानंतर मनीष धुरी मला रोज संध्याकाळी दारू पिऊन फोन करायचे. त्यांनी मला विचारलं की तू कोणासोबत राहतेस?, धुरींना सांगितलं की, मी माझ्या बहिणीसोबत आणि दाजींसोबत राहते. त्यानंतर ते बोलले की कोण आहे तुझा दाजी?,  तेव्हा त्यांना मी सांगितलं की, धनंजय मुंडे माझे दाजी आहेत. तेव्हा धुरी बोलले की, ओ साला धनंजय मुंडे असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली असल्याचं रेणू शर्माने सांगितलं आहे.

दरम्यान, त्यावेळी शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत. हेच मला समजतं नसल्याचं रेणू म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक!!! प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत लपवला

पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत- राहुल गांधी

आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात राहू नका- अण्णा हजारे

“मुंबई-महाराष्ट्रातील देशी औवेसी कोण? ते लवकरच कळेल”

ृृ…यांच्या भजनांसमोर लता मंगेशकरांंचं गाणं फिकं पडतं- भगतसिंह कोश्यारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या