Top News महाराष्ट्र मुंबई

संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही- रेणू शर्मा

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. रेणू शर्माचं नाव सगळीकडे चर्चेत आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यावर आरोप केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

रेणूने काल काही ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. अशाचप्रकारे रेणूने आज मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत एक ट्विट केलं आहे. संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही. मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा, असं रेणू शर्माने म्हटलं आहे.

रेणू शर्माने केलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंनी राजनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडेंनी या प्रकरणात आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करत आपले रेणू शर्माची मोठी बहिण करूणा शर्मासोबत परस्पर सहमतीने संंबंध असल्याचा खुलासा केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक

Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक

“कृषी कायद्यांना स्थगिती देऊन लक्ष्मण रेषा ओलांडली, कोर्टाला अचानक एवढी तत्परता आली कोठून?”

“माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत…”; रामदास आठवले यांनी घेतली नवी शपथ!

“बर्ड फ्लूमुळं व्यावसायिकांचं नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या