Rashmi Shukla | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी फक्त 15 दिवस बाकी असताना मोठी घडामोड घडली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंबंधी आदेश दिले आहेत. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बदलीसाठी कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून सतत मागणी केली जात होती. अखेर या मागणीला यश आलं आहे.
उद्या 5 नोव्हेंबररोजी दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकऱ्यांची नावे राज्याच्या प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवाले जातील. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड होईल. रश्मी शुक्ला यांच्या बढतीबाबत कॉँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले होते.
रश्मी शुक्ला यांची बदली
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यातच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे देखील त्यांनी केली असल्याचं पटोले म्हणाले होते.
अशात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची धामधूम सुरू आहे. याचदरम्यान, निवडणूक आोयगाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करण्याचा आदेश दिलाय. महाविकास आघाडीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
तसेच, रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रश्मी शुक्लांना व त्यांच्या अनुषंगाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधक टार्गेट करत होते. अशात थेट रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
News Title – Replacement of Rashmi Shukla
महत्त्वाच्या बातम्या-
HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!
जरांगेंनी माघार घेण्याचं कारण सांगितलं; म्हणाले, “उमेदवार पडला तर जातीचं हसू..”
ब्रेकिंग! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, अचानक का घेतला निर्णय?
दिवाळीच्या फराळातून पैसे वाटप; सांगलीत शरद पवारांचा उमेदवार अडचणीत?
सिनेइंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह