बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं हे कुठून शिकलात?”

मुंबई | एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार फुटले. 40 आमदारांच्या गट एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडल्याने शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पहिल्यांदाच इतका मोठा बंड पाहायला मिळाला. तर शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा हात होता, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे.

आजपर्यंत शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप केसरकर यांनी पवारांवर केलाय. याला जितेंद्र आव्हाडांनी ट्विट (Tweet) करत उत्तर दिलं आहे.

अहो केसरकर पवार साहेबांच्या विरोधात किती बोलता? एके काळी साहेबांनी तुमच्यासाठी अनेकांना नाराज केलं होतं. तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवलं होतं. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं हे कुठून शिकलात? 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा खाजवून खरूज काढू नका, अशी टीका आव्हाडांनी केसरकरांवर केलीये.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप नेते निलेश राणे यांनी लिमिटमध्ये राहण्याचा इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या

येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर…’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

ममता बॅनर्जींचा पाणीपुरी बनवतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

मोठी बातमी! दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More