Top News देश

आरबीआयचा पुन्हा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा

मुंबई |  कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आरबीआयने पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे 4.40 टक्कांवर असलेला रेपो रेट आता 4.0 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे. तसंच रिव्हर्स रेपो दरात देखील आरबीआयने पुन्हा 40 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रिव्हर्स रेपो दर कमी होऊन 3. 35 टक्के झाला आहे.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने हे मोठं पाऊल उचलल आहे. मान्सूनच्या सकारात्मक अंदाजामुळे कृषी क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं शक्तीकांता दास यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसंबंधी मोठी पावलं जगभरातली सरकारं उचलत आहेत. भारत सरकारने देखील 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतर आज पुन्हा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

आनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा!

राज्यात कोरोनावर मात करण्याचा उच्चांक, एकाच दिवसात बरे झाले 1408 रूग्ण…!

महत्वाच्या बातम्या-

मुलीचा विवाह सोहळा पार पडताच गँगस्टर अरूण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

अमेरिकेचा चीनला सर्वांत मोठा दणका; ट्रम्प यांची मोठी खेळी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या