Top News अहमदनगर महाराष्ट्र

कोरोनाने रायकर कुटुंबाचा केला पुन्हा घात; कुटुंबातील या व्यक्तिचं निधन

अहमदनगर | कोरोनाने जगभरात थैमान घातलं होतं तेव्हा टीव्ही9 चे पत्रकार पांडुरंग रायकर कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी रायकर यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता. अशातच रायकरांच्या घरावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचंही कोरोनाने निधन झालं आहे. अहमदनगरमधील रूग्णलयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी आठ वाजता त्यांचा मृत्यु झाला.

श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी येथे लक्ष्मण रायकर हो भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. आधीच घरातील मुलगा गेल्याचं आभाळाएवढं दु:ख असताना लक्ष्मण रायकर यांच्या जाण्याने रायकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लक्ष्मण रायकरांच्या पश्चात पत्नी सून आणि तीन मुली असा परिवार आहे.

दरम्यान, 2 सप्टेंबरला पांडुरंग रायकर यांना कार्डियाक अँम्बुलन्स न मिळाल्याने त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे वयाच्या 42 व्या वर्षी रायकर यांना आपला जीव गमवावा लागला.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं”

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?”

‘ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही’ म्हणत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विजय मल्ल्या कंगाल; वकिलाची फी देण्यासाठीही नाहीत पैसे

उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या