Republic Day 2022: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बाहेर, ध्वजारोहन सोहळ्याला लावली हजेरी
मुंबई | आज देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यामुळे सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम साजरे होत असलेले पहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निर्बंधांचं पालन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात ध्वजारोहन केल्याचं पहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री जवळपास अडीच महिन्यानंतर बाहेर दिसले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून कित्येक दिवस ते घरीच होते. घरुनच ते राज्याचा कारभार सांभाळत होते. आज प्रजास्त्ताक दिनाच्या निमित्तानं पहिल्यांदा ते बाहेर पडले असून ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
दरम्यान, वर्षावरील ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
Happy Republic Day! #RepublicDay pic.twitter.com/ed1L6lqVrc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2022
थोडक्यात बातम्या –
Republic Day 2022: जीवघेण्या थंडीतही जवानांनी ‘इतक्या’ फूट उंचीवर फडकवला झेंडा
येत्या 2 ते 3 दिवसांत ‘या’ भागात कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा इशारा
अमोल कोल्हेंविरोधात 26 जानेवारीला नारायणगावातील घराबाहेर सविनय आंदोलन
‘देशाचं पहिलं राष्ट्रगीत’ म्हणत कंगनाने शेअर केला व्हिडीओ अन् वादाला तोंड फुटलं
‘या’ जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदीचा आदेश लागू; समोर आलं महत्त्वाचं कारण
Comments are closed.