बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Republic Day 2022: जीवघेण्या थंडीतही जवानांनी ‘इतक्या’ फूट उंचीवर फडकवला झेंडा

नवी दिल्ली | आज 26 जानेवारी म्हणजेच भारताचा आज 73 वा प्रजासत्ताक दिन. 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरात थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे प्रजासत्ताक दिनाची उत्सुकता आणि जल्लोष पहायला मिळत आहे. अमृत महोत्सव दिनी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं पहायला मिळत आहे.

सध्या कोरोनाचा कहर असल्यामुुळे कोरोना नियमांचं पालन करुन सगळीकडे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सगळी काळजी घेत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आपले भारतीय जवान देशासाठी सीमेवर लढत असल्याचं पहायला मिळत आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं. एवढ्या जीवघेण्या थंडीतही आपले भारतीय जवान देशासाठी सीमेवर लढत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. त्यामुळे सध्या भारतीय जवानांवर अभिमान होत असून त्यांच्यावर कौतूकांचा वर्षाव होत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

येत्या 2 ते 3 दिवसांत ‘या’ भागात कडाक्याची थंडी, हवामान विभागाचा इशारा

अमोल कोल्हेंविरोधात 26 जानेवारीला नारायणगावातील घराबाहेर सविनय आंदोलन

‘देशाचं पहिलं राष्ट्रगीत’ म्हणत कंगनाने शेअर केला व्हिडीओ अन् वादाला तोंड फुटलं

‘या’ जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदीचा आदेश लागू; समोर आलं महत्त्वाचं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More