Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठी घोषणा!

Republic Day 2024 30000 Indian students in France in 2030

Republic Day 2024 | संपूर्ण देशात आज (26 जानेवारी) 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीत आजच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हे आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख आहेत. भारतात येताच त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करत याची घोषणा केली आहे. काही दिवसांपुर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर गेले होते. आता इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे भारत आणि फ्रान्सचे संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले असल्याचे दिसून येते. हेच संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक भाग म्हणून मॅक्रॉन यांनी मोठ्या योजनाचा उल्लेख केला आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा

“आम्ही सर्वांसाठी फ्रेंच, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर या उपक्रमासह सार्वजनिक शाळांमध्ये फ्रेंच शिकण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करत आहोत. आम्ही फ्रेंच शिकण्यासाठी नवीन केंद्रांसह Alliance françaises चे नेटवर्क विकसित करत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय वर्ग तयार करत आहोत. ज्या विद्द्यार्थ्यांना फ्रेंच भाषा येत नाही, त्यांना आमच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकेल”, अशी घोषणा इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) केली आहे.

यासोबतच पुढे ते म्हणाले की, “फ्रान्समध्ये शिकलेल्या माजी भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुव्यवस्थित केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना फ्रान्समध्ये परतणं सोपं होईल. 2025 पर्यंत 20 हजार भारतीय विद्यार्थ्यांना प्रथम आकर्षित करण्याचे फ्रान्सचे उद्दिष्ट असून, 2030 पर्यंत 30 हजारच्या मोठ्या उद्दिष्ट आमचे आहे. हे एक अतिशय महत्वाकांक्षी लक्ष्य आहे, परंतु मी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कटिबद्ध आहे,” अशी पोस्ट इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा भारत दौरा

इमॅन्युएल मॅक्रॉन काल (25 जानेवारी) भारतात दखल झाले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत जयपूर येथील जंतर मंतर या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली. आज ते कर्तव्य पथ येथे सोहळ्यासाठी (Republic Day 2024) उपस्थित आहेत. कर्तव्य पथ येथे परेड कमांडर भुवनेश कुमार यांच्या नेतृत्वात संचलनाला सुरूवात झाली आहे.

या परेडमध्ये परथमच देशातील 1500 शेतकरी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहेत. ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात झाली.

News Title- Republic Day 2024 30000 Indian students in France in 2030

महत्त्वाच्या बातम्या –

Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .