मुंबई | फेक टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आलीये.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून फेक टीआरपी घोटाळा उघड करण्यात आला होता. त्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली असून नुकतच रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक केलीये.
या घोटाळ्यामध्ये बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केलीये. तर चौकशी दरम्यान रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलेलं.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होतं. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा तसंच रिपब्लिक टीव्ही यांना वाढीव टीआरपीचा लाभ मिळालेला.
थोडक्यात बातम्या –
होय, मी घरी बसून काम करत होतो, म्हणूनच….; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
“लव्ह जिहादच्या नावाखाली परदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावतात बोली”
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात केक खाण्यासाठी उडाली झुंबड; पाहा व्हिडीयो
‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा