बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाकडून महत्त्वाचे आदेश जारी

श्रीनगर | शुक्रवारी (8 जुलै) रोजी अमरनाथ (Amarnath) येथील एका गुफेजवळ जीवघेणी ढगफुटी झाली. त्यात 25 भाविकांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त भाविक बेपत्ता झाले. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत, वाहनं फसली आहेत तर काही ठिकाणी नागरिक वाहून गेल्याचे वृत्त आहे. इथला संपर्कही तुटला आहे. पूरात अडकलेल्या नागरीकांचे हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य सुरु आहे.

या परिसरात अजूनही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अमरनाथ यात्रेला प्रशासनाने तुर्तास स्थगिती दिली आहे. अमरनाथकडे न येण्याचे आव्हान स्थानिक प्रशासन आणि जम्मू काश्मीर सरकारने केलं आहे. काल उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) यात्राही स्थगित करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु आहे.

पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक बेपत्ता आहेत. धायरी येथील भोसले कुटूंबातील तीन सदस्य अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. यामधील सुनिता भोसले (Sunita Bhosale) यांचे निधन झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोसले कुटुंबीयांची भेट घेतली. शुक्रवारी अमरनाथ यात्रेत एका गुफेजवळ ढगफूटी झाली, या दुर्घटनेत 16 पर्यटकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या पुरात अडकलेल्या नागरिकांना बालाटल (Balatal) येथे आणण्यात येत आहे. लष्कराकडून बचाव कार्य सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने चालणेही कठीण झाले आहे. प्रशासनाने मदत संपर्क क्रमांक (Helpline Number) दिला आहे. 9149720998. या मदत संपर्क क्रमांकावर विचारपूस केली जाऊ शकते.

थोडक्यात बातम्या – 

शिवसेनेत मोठे बदल, उद्धव ठाकरेंनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Koffee With Karan 7: दीपिकाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आलिया ट्रोल

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?, मुख्यमंत्री शिंदेंकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More