बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

मुंबई | मुंबईवरुन वारणसीला जाण्यासाठी एक्सप्रेस ट्रेन कल्याणच्या प्लॅटफोर्म नंबर 4 वरुन सुटली होती. याचवेळी एक वयोवृद्ध आजोबा ट्रेनच्या समोर येऊन आत्महत्या करण्यासाठी उभे राहिले. ही गोष्ट रेल्वेच्या लोको पायलेटने पाहिली. आपल्या इतक्या वर्षांचा अनुभव समोर आणून पायलेटने ब्रेक दाबून आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पायलेटचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून त्यानंतर आजोबांना बाहेर काढण्यात आलं आहे. या संपुर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ रेकाॅर्ड करण्यात आला आहे.

ब्रेक दाबल्यानंतर रेल्वेचा पुढचा भाग आजोबांच्या आंगावर गेला. मात्र तरी रेल्वे रुळाच्या अगदी मदोमद आजोबा अडकले. यानंतर मोटरमनने त्यांना सावकाश बाहेर काढून रेल्वे स्टेशनवर नेलं. या आजोबांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र कुटुंबांतील वादामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचं समोर आलं आहे.

या व्यक्तीला सुखरुप वाचवण्यात यश आला आहे. यामागे रेल्वे पायलेचा मोठा हात आहे. ही घटना रेकाॅर्ड करण्यात आली असून सोशल मीडियावर या घटनेचा थरारक व्हिडीओ प्रचंड व्हायारल होत आहे. तसेच अनेक लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पुढे शेअर करत आहेत.

दरम्यान, रेल्वे रुळावर थांबलेल्या आजोबांना पाहून पायलेटने धाडसीने ब्रेक दाबून आजोबांना वाचवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच आजोबांचा जीव वाचवून त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या लोको पायलेटचे सर्वत्र भरभरुन कौतुक करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

जिवंत असूनही अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा; तक्रार केल्यानंतर मिळालं हे अजब उत्तर

‘100 रूपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या’; भाजप नेत्याची भन्नाट आयडिया

‘सेल्फ केअरच्या नावाखाली स्वत:चं नुकसान करतोय’; अमिर खानच्या मुलीने केला मोठा खुलासा

तिखट आणि धारदार प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधी द्या- नरेंद्र मोदी

काँग्रेसचा मोठा निर्णय; पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More