बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूंनी जगभरातील अनेक लोकांना आपल्या कवेत घेतलं. यामध्ये जगभरातील आणि देशातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना या विषाणुचा संसर्ग झाला. विषाणुचा संसर्ग झाल्यामुळे खुप लोक मृत्यूमूखी पडलेत. अलिकडेच संशोधकांनी कोविड-19 हा कमी तापमान आणि आद्रतेशी संबंधित असून तो मोसमी इन्फ्लूएंझासारखा असल्याची माहिती शोधून काढली आहे.

सार्स सीओव्ही 2 विषाणूंचा संसर्ग हवेतून होऊ शकतो. त्यामुळे हवेसंबंधित आजारापासून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असं नेचर काॅम्प्युटेशनल सायन्सच्या नियतकालिकात म्हटलं आहे. तर सार्स सीओव्ही 2 विषाणू हा इन्फ्लुएंझाच्या विषाणूसारखा मोसमी विषाणू आहे. तसेच तो वर्षातील कोणत्याही मोसमात पसरू शकतो, असं स्पेनमधील बार्सेलोना इन्स्टिट्युट ऑफ ग्लोबल हेल्थ येथील वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

सुरुवातीला या विषाणुंचा अभ्यास केला तेव्हा, चीनमध्ये 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होते. त्यावेळी तेथे आद्रताही कमी होती. परंतु नंतर हा विषाणू 30 ते 50 अंशाच्या प्रदेशातही प्रसार झाला. त्यामुळे कोविड-19 मध्ये मोसमी आजाराचे प्रमाण जास्त दिसून आले आहेत, असं क्लायमेट अॅॅड हेल्थ प्रोग्रॅम या संस्थेचे संचालक झेवियर रोडो यांनी म्हटलं आहे. त्यांनी 5 खंडातील 162 देशांचा अभ्यास केला आहे.

दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात तसेच भारतात लसीकरणाची जोरदार मोहिम राबवली जात आहे. अलिकडेच भारतात 100 कोटी लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच कोरोना धोका अद्यापही टळलेला नसून नागरिकांना आपली काळजी घेेेेणे आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या’; आणखी एका साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

“मी आजही हिंदूच, आईची इच्छा होती म्हणून मी…”

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More