बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ लोकांना कोरोनाच्या दोन डोसची गरज पडणार नाही; संशोधक म्हणतात… 

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण कसं करायचं? असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीनं एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.

त्यामुळे आता भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना लसीकरणाची पुढची नियमावली बदलली जाणार का?  हे पाहावे लागणार आहे. देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि राज्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वेगवेगळ्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितल्या जात आहे. तर या बैठकीत कोरोना लसीकरणासंदर्भात काही नवीन बदल ठरवले जाणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळं अन्न आणि औषध प्रशासनानं रायगड जिल्ह्यात लगेचच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

रणधीर कपूर यांनी ‘या’ कारणाने वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय, म्हणाले…

…म्हणून तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More