Top News कोरोना देश

संशोधकांना मोठं यश; कोरोना संसर्गाचे ‘हे’ सहा प्रकार आणले समोर

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गाचे प्रकार समोर येत आहे. लंडन येथील किंग्ज कॉलेजमधील शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सहा प्रकार एका पाहणीतून आढळले आहेत.

मार्च व एप्रिल महिन्यात ब्रिटन आणि अमेरिका या देशातील १,६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. कोरोना झालेल्या पहिल्या ८ ते १० दिवसांत रुग्णांमध्ये संसर्ग कमी किंवा मध्यम आणि काहींमध्ये तीव्र लक्षणे आढळून आली तर वयोवृध्दांमध्ये हे प्रमाण अधिकच नाजूक असल्याचे आढळले.

पहिला प्रकार-

पहिल्या प्रकारात रुग्णांना फ्लूची लक्षणे दिसत होती तसेच त्यांना तापही आला नव्हता. या रुग्णांना सर्दी, घसा व छातीत दुखणे, स्नायूंमध्ये वेदना होणे आणि डोकेदुखी हे त्रास झाले.

दुसरा प्रकार-

दुसऱ्या प्रकारात फ्लूची सगळी लक्षणे दिसली आणि त्याला तापही आला होता. अपचन होणे, आवाज बसणे आणि कोरडा खोकलाही झाला होता.

तिसरा प्रकार-

तिसऱ्या प्रकारातील संसर्गाचा संबंध हा पोटातील अवयवांशी होता. निराश वाटणे, उलट्या होणे, अतिसार आदी लक्षणे तसेच छातीत दुखणे आणि डोकेदुखीचा त्रासही सहन करावा लागला.

चौथा प्रकार-

चौथ्या प्रकारात रुग्णाला अशक्तपणा येतो आणि त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. थकवा, डोकेदुखी, वास व चव न जाणवणे, छातीत दुखणे, ताप असे त्रास सहन करावे लागले.

पाचवा प्रकार-

पाचव्या प्रकारात रुग्णाच्या शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. यात चौथ्या प्रकाराची सर्व लक्षणे या रुग्णात आढळतात.

सहावा प्रकार-

सहाव्या प्रकारात पहिल्या काही आठवड्यातच रुग्णाच्या मनाचा वारंवार गोंधळ उडतो. मागचीच सर्व लक्षणे असल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करतात आणि गरज लागली तर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून ऑक्सिजनही दिला जातो.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या औषधाचा दावा अंगलट; न्यायालयाने ‘पतंजली’ला ठोठावला इतक्या लाखांचा दंड

राज्यातील शाळा ‘या’ अ‌ॅपवर भरणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांवर सोपवली मोठी जबाबदारी

पुण्यात कोरोनाची लाट ओसरण्याची शक्यता; ‘ही’ आकडेवारी दिलासा देणारी

मनमाड हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांची गळा चिरून हत्या; 4 वर्षांच्या चिमुरडीला….

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या