बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही”

सांगली | ओबीसी आरक्षणावरून (OBC reservation) राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसी आरक्षणाकरिता केंद्र सरकारकडून (Central Government) इम्पेरीकल डेटा मिळत नाही, असा आरोप राज्यातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (NCP President Sharad Pawar) टीका केली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश झाला असून आता हक्क मागून मिळणार नाही, तर हिसकावून घ्यावा लागेल, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच शकुनी काकाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली आहे.

सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट सांगितले होते की, अध्यादेश काढण्यापुर्वी इम्पेरीकल डेटा गोळा करा आणि मगच अध्यादेश काढा. परंतु, प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता. म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला आणि सुरूवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातो, अशी टीकाही गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान, जोपर्यंत शकुनी काकांच्या इशाऱ्यावर हे प्रस्थापितांचं सरकार चालतयं तोवर हे फक्त दाखवण्यापुरते नाटक करून तोंडाला पान पुसण्याचं काम करतील, असं गोपीचंद पडळर यांनी म्हटलं आहे. तसेच जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आमच्या बहुजनांचे हक्क हिरावले गेले नसते. तसेच हक्क घेतल्याशिवाय मिळणार नाहीत, आपण आता लढा उभा करू, असं त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा”

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघंही घमेंडी”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, त्यांची छटाकभर लायकी मात्र…”

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

फडणवीस म्हणतात, “…तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More