अमित शहा अहंकारी; पाच राज्यांच्या निकालानंतर मोदी-शहांना पक्षातूनच ‘विरोध’!

अमित शहा अहंकारी; पाच राज्यांच्या निकालानंतर मोदी-शहांना पक्षातूनच ‘विरोध’!

गांधीनगर | ही आत्मविश्वासाची हार नसून ही अहंकाराची हार आहे, तसेच अमित शहा गर्विष्ठ आहेत, अशा शब्दात भाजप नेत्या रेश्मा पटेल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या भाजप नेत्या रेश्मा पटेल यांनी ट्वीट करून भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा कार्यकर्त्याचं मत विचारात घेत नाहीत. जसं काही तेच सरकार चालवतात या आविर्भावात ते वावरत असतात, असाही आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, भाजपचा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे मोदी-शहांना पक्षातूनच विरोध होताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

Google+ Linkedin