बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

पणजी | गोव्यातील भाजप नेते आणि मंत्री मायकल लोबो यांनी महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

गोवा याआधी ग्रीन झोनमध्ये होतं, संपूर्ण राज्याचा विचार केला तर आम्ही अजुनही ग्रीन झोनमध्येच आहोत. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसांत दोन-तीन लोकं दिल्लीवरुन राज्यात आली होती, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, असं लोबो यांनी सांगितलं आहे.

सध्या राज्यात जे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत, त्यातील बहुतांश हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी केली आहे, असं लोबो यांनी सांगितलंय.

महाराष्ट्रातील लोकांवर बंदी घाला याचा अर्थ असा नाही की मी तिकडच्या लोकांविरोधात आहे. पण सध्या सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे पुढील काही कालावधीसाठी ही बंदी घालण्यात यावी, असं लोबो म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

कौतुकास्पद उपक्रम! असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More