Resign MLA | विधानसभेतील दोन आमदारांनी राजीनामे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ते आमदार सध्या विद्यमान खासदार आहेत. तर आता आणखी चार आमदार हे राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. सोलापुरच्या माजी आमदार प्रणिती शिंदे यांना जनतेनं खासदार म्हणून निवडून दिलं आणि त्या सोलापूरच्या पहिल्या खासदार आहेत. तर दुसरीकडे बळवंत वानखेडे देखील आमदार होते त्यांनी देखील आमदाराकीचा राजीनामा (Resign MLA) दिला आहे.
महाविकास आघाडीने राज्यात एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महायुतीने केवळ 17 जागांवर विजय मिळवला असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे देखील सांगलीतून विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आता 7 सात विद्यमान आमदार आहेत त्यामुळे आता सर्वांनाच राजीनामा द्यावा (Resign MLA) लागणार आहेत.
राज्यातील निवडणुकांची घोषणा ही पुढील चार ते पाच महिन्यात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागलं आहे. लोकसभेनंतर आता राजकीय नेत्यांचं लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. नवनिर्वाचित खासदारांनी आमदारकीचा राजीनामा (Resign MLA) द्यायला सुरूवात केली. त्यांना आगामी 20 जूनपर्यंत राजीनामा द्यायला (Resign MLA) सुरूवात केली आहे.
‘या’ आमदारांनी दिला राजीनामा
आता पर्यंत प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मात्र आता अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. यामुळे आता उर्वरित आमदारही लवकरच राजीनामा देतील.
‘हे’ आमदार राजीनामा देण्याच्या मार्गावर
विदर्भातील वर्धा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट सुधीर मुनगुंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर मराठवाड्यातील संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद मतदारसंघातून पराभव केला. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकरांचा केवळ 48 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे.
News Title – Resign MLA Praniti Shinde And Balwant Wankhede Resign From MLA Post
महत्त्वाच्या बातम्या
कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर अखेर करणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
“जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग, लोक आता मनसेची वाट बघतायेत”
नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं
गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..
“जीव देऊन भागणार नाही बाळांनो, तुम्हाला माझी शपथ”; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती