बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल- लालू प्रसाद यादव

पाटणा | राहुल गांधींनी भाजपच्या जाळ्यात अडकू नये. राहुल यांनी राजीनामा देणंं काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल, असा सल्ला बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राहुल गांधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर लालू यादव यांनी राहुल यांना सल्ला दिला आहे.

राहुल गांधींनी राजीनामा द्यावा हाच खरा भाजपचा डाव आहे. त्यामुळे राहुल यांनी या डावाला बळी पडू नये, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी राजीनामा देण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या

-शिवसेनेचा मराठी बाणा; खासदारकीची घेणार मराठीतून शपथ

-राष्ट्रवादीच्या या पराभूत नेत्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण

-‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

-खासदार धैर्यशील माने आशीर्वादासाठी पोहोचले थेट राजू शेट्टींच्या घरी

-“राममंदिराबाबत न्यायालयाने पुरावे चिवडीत बसू नये; जनादेश मानायला हवा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More