विधानसभेच्या ‘या’ 8 आमदारांनी दिले आमदारकीचे राजीनामे! नार्वेकरांनी दिली माहिती

Maharashtra l राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली आहेत. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे अशा सर्व आमदारांची नावं थेट सभागृहात वाचून दाखवली आहेत.

राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली माहिती :

यामध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांची नावे आहेत. यामध्ये राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह 8 दिग्गज आमदारांचा समावेश आहे.

राजू पारवे यांनी काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला. तर आज आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात कोणत्या आमदारांनी0 राजीनामे दिले आहेत यांची यादी वाचून दाखवली आहे ते जाणून घेऊयात…

Maharashtra l या आमदारांनी दिले राजीनामे :

१) राजू पारवे – उमरेड विधानसभा
२) निलेश लंके – पारनेर विधानसभा
३) प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य
४) बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
५) प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा
६) संदीपान भुमरे – पैठण विधानसभा
७) रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
८) वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा

News Title –Resignation of 8 MLA from Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; 1 रुपयात पीक विम्याच्या नावाखाली मोठा घोटाळा समोर

…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?

पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये

देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल