बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपलं असं होत नाही- प्रविण दरेकर

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाआधी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेतला आहे. यावर विधानपरिषदेचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रया दिली आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा दिला म्हणजे त्यांना निर्दोषत्व बहाल झालं असं होत नाही. अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावीच लागणार असल्याचं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर पूजा चव्हाण आत्महत्या की हत्या या प्रकरणाची चौकीशी झालीच पाहीजेल, अशी मागणी देखील प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे महिलेच्या सुरक्षतेशी निगडीत असून या प्रकरणात संजय राठोड यांचा संबंध आहे की नाही याची चौकशी करुन या प्रकरणातील सत्य आणि तथ्य समोर आलं पाहिजे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी राठोडांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रीया दिली असून या प्रकरणाची कठोर चौकशी करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, म्हणाले….

…मग आता संजय राठोड यांना अटक करा- अतुल भातखळकर

संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!

सर्वात मोठी बातमी, अखेर संजय राठोडांनी राजीनामा दिला

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून नीलम गोऱ्हे टार्गेट; ताई लवकर या आणि भूमिका घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More