महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर
सोलापूर | करमाळा तालुक्यातील श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रो या रोहित पवार यांच्या कंपनीकडे जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कंपनी श्री आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेणार आहे.
कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत 612 कारखान्याच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. या सर्वसाधारण सभेत आदिनाथ साखर कारखाना हा बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर 98% सदस्यांनी होकार दर्शवल्याने अधिकृतरित्या आता आदिनाथ कारखाना रोहित पवारांकडे जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.
या ठरावाप्रमाणे आता करमाळ्यातील श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीकडे 25 वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात येणार आहे. शिखर बँकेने संबंधित ठराव मांडला होता या ठरावावर विचार केल्यानंतर आता रोहित पवारांकडे हा कारखाना जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कार्यक्रमात कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आभार व्यक्त केले असून कर्मचारी सभासद तसेच वाहतूकदार यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आम्ही समर्थ ठरल्याची माहिती कारखान्याचे संचालक धनंजय डोंगरे यांनी दिली आहे. दरम्यान आता सोलापूर जिल्ह्यातील श्री आदिनाथ सहकारी कारखाना बारामती ॲग्रो कंपनी पुढील 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवणार आहे.
थोडक्यात बातम्या –
चोरीनंतर झालं असं काही की… चोराला अत्यानंदानेच आला हृदयविकाराचा झटका
पुण्यात कोरोनाचा डेंजर प्रसार सुरु, पाहा गेल्या 7 दिवसांची धक्कादायक आकडेवारी
शरद पवारांच्या प्रकृतीवर केलेल्या टीकेबद्दल भाजपने ‘माफी’ मागावी, नाहीतर…- हसन मुश्रीफ
पुण्यात संध्याकाळी ६ नंतर सारं काही बंद, मात्र फूड डिलिव्हरीसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय
कोरोनाचा नवा विषाणू आहे अत्यंत घातक, जाणून घ्या नवीन विषाणूची लक्षणं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.