नवी दिल्ली | भाजपचा (BJP) गुजरातमध्ये दणदणीत विजय झाला आहे. भाजपच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं पहायला मिळत आहे.
अनेक वर्षांनंतर या निवडणुकीत भाजपने प्रचंड असं बहुमत मिळवलं आहे. एक्झिट पोलनुसार 182 पैकी 157 जागा मिळवून भाजप विजयी झालं आहे. अशातच या निवडणुकीच्या मैदानात क्रिकेटपटूची (Cricketer) पत्नी विजयी झाल्याने जल्लोष केला जात आहे.
क्रिकेटवीर रविंद्र जडेजा(Ravindra Jadeja) यांची पत्नी रिबावा जडेजा (Ribawa Jadeja) विजयी झाल्या आहेत. त्या जामनगरमधून निवडणुकीसाठी उभारल्या होत्या. मतमोजणीच्या सुरुवातीला त्या मागे होत्या पण आता त्या विजयी ठरल्या आहेत.
रिवाबा या गेली तीन वर्ष भाजपमध्ये आहेत. या पूर्वी त्या करणीसेनेमध्ये होत्या. याशिवाय त्या अनेक सामाजिक संस्थाशी (Social Institutions) निगडीत आहेत. रविंद्र जडेजा त्यांना नेहमीच मदत करताना दिसतात.
विजयी झाल्यानंतर रिबावा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या हा फक्त माझा नाही तर भाजपचा विजय आहे. ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानते.
महत्त्वाच्या बातम्या