बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

अमरावती | मतदार संघाच्या हक्कासाठी, तुमच्या मागण्यांसाठी मंत्री यशोमती ठाकूर या रणरागिणी झाल्याचं आपण पाहिलं आहे. वेळ आली तर त्या तुमच्यासाठी CM च्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नाना पटोले यांचा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी अनेकवेळा समोर आली आहे. आता पटोलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन राजकीय पडसाद उमटण्या सुरुवात झाली आहे. पटोलेंच्या वक्तव्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांच्यासह यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अन्याय झाल्यास मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जाऊ, अन्याय झाल्यास मंत्री यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना भिडतील, ⁦नाना पटोले यांचं⁩ वक्तव्य. यशोमती ठाकूर ⁩ यांनी केलेली मारहाण पटोलेच्या लक्षात आहे वाटत. काय भाषा? काहीतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान ठेवा, अशी बोचरी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पहिल्या टप्यात ‘या’ किल्ल्यांचा समावेश

“राजकारणात पैसाच बोलतोय मात्र शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष”

‘या’ जिल्ह्यातील तळीरामांसाठी खुशखबर; मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार

“…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत”

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More